नागपूर : देशभरात सुरू असलेल्या सीएए संदर्भातील विरोध लक्षात घेता, नागपूरमध्ये असलेल्या पाकिस्तानी, बांगलादेशी, अफगाणिस्तानमधील घुसखोरांवर नागपूर पोलीसांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार गिरीश व्यास यांनी पत्रकार परीषदेत केली. सीएए कायद्याचे स्वरूप वारंवार स्पष्ट करूनही केवळ मतांच्या राजकारणासाठी मुस्लिमांना संभ्रमीत केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाकिस्तान, बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्यांची मुंबईमध्ये 50 लाख तर नागपुरात 45 हजारांच्या घरात संख्या आहे. या घुसखोरांना शोधून त्यांची यादी जाहिर करावी, अशी मागणी आ. गिरीश व्यास यांनी राज्य सरकारला केली आहे. सीएए कायद्याचे स्वरूप वारंवार स्पष्ट करूनही केवळ मतांच्या राजकारणासाठी मुस्लिमांना संभ्रमीत केले जात आहे. भारतीय लोकांना या कायदयाचा कुठलाही त्रास होणार नाही. परंतु, आपल्या देशात राहणाऱ्या घुसखोरांवर कडक कारवाई या कायदयाअंतर्गंत करण्यात यावी, असे आमदार व्यास म्हणाले.
शहरातील जाफरनगरमध्ये काल झालेल्या एका सभेत, सेवानिवृत्त न्यायाधीशांनी आक्षेपार्ह विधान करून, कायदयाबाबत हिंदु मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या शिवाणी दाणी यांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली आहे. अशाप्रकारे समाजात आपसात द्वेश निर्माण होईल असे उद्गार काढण्यावर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. पत्रपरीषदेत शिवराय कुळकर्णी, चंदन गोस्वामी, शिवाणी दाणी, किशोर पाटील, राजीव शर्मा, अनुज शर्मा उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.